व्हिटॅमिन ए च्या कमतरते मुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना
१) Vitamin Aच्या कमतरतेमुळे पुढीप्रमाणे समस्या होऊ शकतात
डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए अत्यंत गरजेचं आहे. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधलेपणा येण्याचा धोका वाढतो.
तसचं महिलांमध्ये व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे गर्भधारणेसाठी समस्या येऊ शकतात. तसचं गरोदर महिलांमध्ये देखील Vitamin Aच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
Vitamin Aच्या कमतरतेमुळे रोगप्रिकारक शक्तीच्या कार्यावर परिणाम होतो.
लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन ए ची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर होवू शकतो.
तसचं त्वचा आणि डोळे तसचं केस कोरडे होण्याची
समस्या निर्माण होते.
२) Vitamin A खालील दिलेल्या फळ पालेभाज्या मधे भरपूर प्रमाणात मिळतात.
रताळं- रताळं हे एक कंदमुळ असून यामध्ये मोठ्या प्रमाणात Vitamin A आढळतं. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये जवळपास 900 mcg व्हिटॅमिन A उपलब्ध असतं.
तसंच यात त्वचेसाठी फायदेशीर असणारं कॅरेटीन देखील मुबलक प्रमाणात आढळतं.
तसचं यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, आयरन आणि फायबर असल्याने शरीराला अनेक फायदे होतात. खास करून लहान मुलांसाठी रताळ्याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं, रताळ हे पोट साफ होण्यासाठी ही खूप उपयुक्त आहे.
गाजर- गाजरमध्ये देखील व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात उपलब्ध असत. नियमितपणे गाजराचं सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेचं फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करतात.
टोमॅटो- रोजच्या जेवणासाठी वापरला जाणारा टोमॅटो हा देखील व्हिटॅमिन एचा एक चांगला स्त्रोत आहे. तसचं यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. टोमॅटोच्या नियमित सेवनामुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. तसचं विषारी किरणांमुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी टोमॅटोचं सेवन उपयुक्त ठरतं.
४. आंबा- आंबा हे फळ फक्त मे महिन्यातच उपलब्ध असलं तरी त्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए तसचं व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढणारे अँटी ऑक्सिडंट्ल आढळतात. तसंच आंब्यामध्ये इतरही अनेक पोषक तत्व असल्याने मे महिन्याच्या दिवसांमध्ये आंबे खाण्याची मनसोक्त मजा लुटावी. याचा फायदा तुमच्या आरोग्याला होईल. डायबेटिक असलेल्यानी मात्र डॉक्टर च्या सल्ला घेऊनच आंबा खावा.
५. हिरव्या पालेभाज्या- हिरव्या पालेभाज्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळतं.
तसचं या भाज्यांमध्ये इतरही अनेक व्हिटॅमिन आणि खनिजं आढळतात जी शरीरासाठी गरजेची असतात.
Comments
Post a Comment